शहरातील मध्यवर्ती भागात चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.पाटील मळ्यातील एका घरात चोरांनी डल्ला मारून तीस हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे.
पाटील मळ्यातील समितीचे कार्यकर्ते विजय होनगेकर यांच्या घरात बाहेरून कुलूप लावून 2 हजार रुपये रोख चांदी सोन्याचे किरकोळ दागिने अशी एकूण 30 हजार रुपयांची चोरी झाली आहे.विजय यांचे घर एकदम कडेला असून रेल्वे रुळांच्या शेजारी आहे याचा फायदा घेत चोरट्यांनी आजू बाजूच्या चार घरांना बाहेरून कुलूप लावला होता.रविवारी घरातील मंडळी संकेश्वर गणपतीला दर्शन घेऊन परतून वरच्या मजल्यावर झोपले होते त्यावेळी खालच्या मजल्यावर ही चोरी झाली आहे.सोमवारी पहाटे शेजाऱ्यांना फोन करून बाहेरून लॉक केलेली दारे उघडण्यात आली अशी माहिती उपलब्ध झाली आहे
गेल्या 7 जुलै रोजी देखील याच घरात चोरट्यानी प्रवेश करून अडीच लाखांचा ऐवज पळवला होता या घटनेच्या दोन महिन्यांनी पुन्हा एकदा चोरट्यानी डल्ला मारला आहे.