या वर्षी 21 ते 30 सप्टेंबर काळात होणाऱ्या दुर्गामाता दौड मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच सुवर्ण सिंहासन पुन्हा रायगडावर बसविण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे याबाबत शिव प्रतिष्ठांनच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी मारुती गल्लीतील मारुती मंदिरात शहर आणि तालुक्यातील शिव प्रतिष्ठांनची यावर्षीची दुर्गामाता दौड आयोजना संदर्भात बैठक आयोजित केली होती.
रायगडावर महाराजांच्या काळात 32 मन म्हणजेच 1280 किलो सोन्याच सुवर्ण सिंहासन होतं ते मोंगलांच्या काळात नष्ट झाल होत ते सुवर्ण सिंहासन पुन्हा उभारण्यात येणार आहे त्याबद्दल दौड मध्ये जनजागृती केली जाणार आहे.
यावर्षीच्या दौड मधील 9 दिवसाचे सर्व मार्ग कोणते याबद्दल चर्चा करण्यात आली.पहिल्या दिवशी पहिली दौड छ शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिर पर्यंत असणार आहे.
नवरात्रीत दौडच्या शेवटच्या दिवशी शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी 150 हुन अधिक शिवप्रतिष्ठाचे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.