जायंट्स मेन चे सदस्य प्रदीप चव्हाण यांनी बेनकनहळ्ळी गावचे रामा गुंडू काटकर या अपंग व्यक्तीला तीनचाकी सायकल भेट दिली.
प्रदीप चव्हाण हे मूळचे बेळगावचे रहिवासी पण नोकरीनिमित्त ते गुजरात मधील सुरत येथे रहातात, गेल्यावर्षी त्यांनी तरुण भारत मध्ये एक बातमी आली होती की अपंग युवकाचे सायकलसाठी हेलपाटे. ही बातमी त्यांनी नेट वरून वाचली आणि ताबडतोब आम्हाला फोन केले की त्या अपंग व्यक्तीचा शोध घ्या आणि माझ्याकडून जायंट्स मेन च्या माध्यमातून त्यांना आजच्या आज सायकल भेट द्या.
पण ज्या व्यक्तीचा फोटो त्यांनी पेपरला बघितला होता त्या व्यक्तीचा पत्ता आम्ही शोधून काढला तर ती व्यक्ती सधन होती,
मग आम्ही दुसरी अपंग व्यक्ती उचगावची शोधून काढली खरोखरच त्या व्यक्तीला तीन चाकी सायकलची गरज होती, ती गेल्यावर्षी १५ आगस्ट रोजी त्यांना प्रदान केली,
आणि गुरुवार ता ७ रोजी बेनकनहळ्ळीची अपंग व्यक्ती रामा गुंडू काटकर याना मोहन कारेकर यांच्या निवासस्थानी बोलावून माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली.
तसेच शनेश्वर भक्त मंडळाला सुद्धा प्रदीप चव्हाण यांनी जायंट्स मेन च्या माध्यमातून आजारी व्यक्तींना वापरण्यासाठी एअर बॅग आणि त्यासाठी लागणारी मशीन त्यांनी दिली.
यावेळी जायंट्स मेन चे पदाधिकारी अध्यक्ष उमेश पाटील,मदन बामणे, मोहन कारेकर, अशोक हलगेकर, सुनील भोसले, महादेव पाटील, अरुण काळे,अविनाश पाटील, विनोद आंबेवाडीकर,लक्ष्मण शिंदे, विनोद आंबेवाडीकर, पुंडलिक पावशे, मधु पाटील, मधु बेळगावकर, संजय शिवनगौडा पाटील, अनिल चौधरी, शिवराज पाटील, अजित कोकणे, विकास कलघटगी, भाऊ किल्लेकर उपस्थित होते.गरजू अपंग व्यक्ती बबन भोबे यांच्याकडून मिळाली त्यांचेही सहकार्य लाभले