मुस्लिम असूनही गणेश मंडळाचा पदाधिकारी म्हणून सतत चार वर्षे काम करत साऱ्या बेळगावकरा समोर आदर्श निर्माण करून धार्मिक सलोखा राखलेल्या मंडळाचा आणि त्या युवकाचा सत्कार पोलीस विभागाने केला आहे.बेळगाव live ने या युवकाची बातमी केली होती या बातमीची दखल पोलिसांनी आहे या युवकाचा सत्कार केला आहे.
शिवाजी नगर तिसरी गल्ली येथील गणेश मंडळाचा खजिनदार असलेल्या जरताज जकाती याचा सत्कार मार्केट उपविभागाचे ए सी पी शंकर मारिहाळ यांनी केला आहे. मंगळवारी दुपारी मंडळात जाऊन मारिहाळ यांनी जकाती यास शाल गुच्छ देत सत्कार केला.यावेळी बेळगावात नेहमी धार्मिक सौहार्दते साठी काम करणारे साजिद सय्यद आणि सुनील जाधव उपस्थित होतेबेळगाव सारख्या संवेदनशील शहरात धार्मिक सौहार्दता जपलेला युवकाचा आणि या गणेश मंडळाचा आदर्श बेळगावकरानी घ्यावा अश्याने शहरात कायमची शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल असं मत यावेळी ए सी पी मारिहाळ यांनी व्यक्त केली.स्वयंम शिक्षण संस्थेचे महेश लाड यांनी सूत्रसंचालन केले तर मंडळाचे विजय पवार यांनी आभार मानले