देवाधिदेव गणेश आज विसर्जनांनंतर निरोप घेणार आहेत. त्यांना निरोप देण्याची तयारी सर्वत्र सुरू आहे. बारा दिवसांच्या घरगुती मूर्तींचे विसर्जन बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यात सकाळपासून सुरू आहे.
सगळीकडे वाजत गाजत आणि फटाके वाजवत निरोप देण्यात येत आहे. यासाठी सगळीच मंडळी नटून थटून तयार झाले आहेत. यंदा पौर्णिमेच्या पूर्वी विसर्जन करा असा सल्ला देण्यात आल्यामुळे सकाळपासूनच गडबड सुरू आहे.
दुपारी ४ वाजता बेळगाव शहराच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, महामंडळ अध्यक्ष आमदार संभाजी पाटील, पोलीस व प्रशासन अधिकारी यावेळी उपस्थित राहून शोभा वाढवणार आहेत.