कोर्ट समोर जिल्हाधिकारी कार्यालया जवळ घातलेले बॅरिकडेस हटविण्यात यावे अशी मागणी वकिलांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दुभाजाकवर दोन दिवसांपूर्वी बॅरिकडेस घातले गेले होते. मात्र, आज अचानक येथून चालत जाण्यासाठी मार्ग करून दिला आहे. त्याला वकिलांनी विरोध दर्शविला. बॅरिकडेस हटविण्याची मागणी केली आहे.
बॅरिकडेसला व अंडरग्राऊंड ब्रिजला वकिलांनी विरोध केला आहे. वकिलांनी यावर बहिष्कार घातला आहे. त्याचा वापर होत नाही. त्यासाठी बॅरिकडेस घालून ब्रिजचा वापर वाढविण्याचे नियोजन आहे. पण यामुळे काम करणे शक्य नाही. नवीन आणि जुन्या न्यायालायत जात येत नाही अस देखील वकिलांनी निवेदनात म्हटलं आहे.त्याबद्दल एडीसी सुरेश इटनाल यांना निवेदन देऊन बॅरिकडेस हटविण्याची मागणी केली आहे. ऍड एस. एस. किवडसन्नावर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी अनेक वकील उपस्थित होते.