बेळगावात पासपोर्ट चे कार्यालय सुरू करण्यासाठी खासदार प्रभाकर कोरे लक्ष्य घालणार आहेत. सिटीझन कौन्सिल तर्फे त्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
रविवारी त्यांच्या घरी कोन्सिल च्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली. चेंबर पास्ट फोरम चे सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, सेवनतीलाल शाह विकास कलघटगी उपस्थित होते
बेळगावातील पासपोर्ट केंद्र सुरू होण्यास या ना त्या कारणाने दिरंगाई होतच आहे. बेळगावच्या मागून कोल्हापूर मधील पासपोर्ट केंद्र सुरू झालं मात्र बेळगाव पास पोर्ट केंद्रांच काम असच खितपत पडलं आहे.
आर टी आय कार्यकर्ते उदय किंजवडेकर यांनी मिळवलेल्या माहिती नुसार विदेशी व्यवहार मंत्रालयाने बेळगावच पास पोर्ट चे कामाचा प्रोसेस सुरू आहे अस म्हटलंय तर राज्य सरकार केंद्रा सोबत कोणताही पत्र व्यवहार झाला नाही असं स्पष्ट केलंय.गेल्या महिन्यात पासपोर्ट कार्यलयाचे संचालकांनी भेट दिलो होती .आता खासदार प्रभाकर कोरे विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज्य यांची भेट घेणार आहेत तर विदेश व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत