संगोळी रायनना सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पूगोळ यांच्यावर केस दाखल करून कोट्यवधींची ठेवी केलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून द्या अशी मागणी काँग्रेस नेते शंकर मूनवळळी यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना सहकार खात देण्यात आलं आहे त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून ठेवीदारांना न्याय द्यावा अशी मागणी देखील मूनवळळी यांनी केली आहे.
जनतेने आपल्या मेहनतीचे पैसे रायन्ना संस्थेत ठेवी केल्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने न्यायालयात सो मोटो प्रकरण दाखल करावं अस देखील मूनव ळळी म्हणाले. वृत्तपत्रातुन जाहिराती देऊन अधिक टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवून ठेवी लूट केल्या प्रमाणे गोळा केल्या आहेत असा आरोप यावेळी केला आहे
Trending Now