केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यात अपयश आलेल्या खासदारासह बेळगावातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानपिचक्या प्रदेश भाजप अध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांनी घेतल्या आहेत.बेळगाव उत्तर दक्षिण आणि ग्रामीण मतदार संघात गटबाजी केल्याचा ठपका ठेवत चांगलेच धारेवर धरले.
शनिवारी रात्री बंगळुरू येथील पक्ष कार्यालयात आयोजित कोअर कमिटीच्या बैठकीत येडीयुराप्पा यांच्या सोबत कर्नाटक प्रभारी के मुरलीधर राव उपस्थित होते यावेळी बेळगाव भाजप नेत्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
विधान सभेचं तिकीट कुणालाही ध्यायचे अध्याप ठरवलं नसून बेळगावातील नेत्यांनी अंतर्गत असे अनेक गट तयार केले आहेत ते बंद करा अशी सक्त ताकीद येडीयुराप्पानी स्थानिक भाजप नेत्यांना दिली आहे.
भाजप हा पक्ष कोणतेही व्यक्ती निष्ठा सहन करणारा पक्ष असून व्यक्ती पेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे गट बाजी बंद करा तिकीट कुणाला द्यायचे ते केंद्रातील नेते ठरवतात सर्वे केला जाईल असा अर्ध्या तासांचा क्लास घेतला गेला.
रविवारी रात्री निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर बंगळुरू ला येणार आहेत ते देखील निवडणुकांचा आढावा घेणार आहेत.बेळगाव भाजप नेते राजू चिक्कनगौडर यांना मंगळुरू ला जाणाऱ्या बाईक रॅली च प्रतिनिधींत्व देण्यात आलं आहे