हुंड्याची मागणी करत दारूच्या नशेत स्वतःच्या पत्नीच्या डोकीवरचे केस कापुन सिगारेट चे चटके देऊन चाकूने हातावर आणि चेहऱ्यावर हल्ला केल्याची अमानवीय घटना घडली आहे.
आपल्या पती कडून दररोज होत असलेला शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असलेल्या पत्नी ने रक्षणासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शाबंदर गावात ही घटना घडली आहे. तर कावेरी शांतप्पा वाली वय 40 अस त्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.
गेल्या एक वर्षापूर्वी अर्जुन बागेराय सोबत कावेरीच लग्न झालं होतं गेल्या सहा महिन्यापासून अर्जुन मानसिक त्रास देत होता सध्या तो लोकायुक्त बंगळुरू कार्यालयात पियुन काम करत असून तो हुक्केरी येथील इस्लामपूर येथील रहिवासी आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी बंगळुरू असतेवेळी त्याने कावेरीला या प्रकारची हिंसा केली आहे असा आरोप कावेरीने केलाय या प्रकरणी तिने पती विरोधात बेळगाव महिला पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.