त्याग आणि बलिदानाच प्रतीक असलेला बकरी ईद हा सण बेळगावात श्रद्धा आणि भक्तीने पाळण्यात आला.शनिवारी सकाळी हजारो मुस्लिम बांधवांनी अंजुमन संस्थेच्या इदगाह मैदानात दोन वेळा विशेष नमाज पठण केलं.
पहिल्या सामूहिक नमाज मध्ये मुफ्ती अब्दुल अजीज यांनी बकरी ईद सणाचा संदेश देत त्याग बलिदानाचा प्रतीक असलेला हा सण प्रेम शेजार धर्म सहकार्य पाडत धार्मिक कर्तव्य पार पाडा आवाहन केलं तर दुसऱ्या सत्रात मुफ्ती मंजूर आलम यांनी देखील बकरी ईद सणाच महत्व पटवून सांगितलं.यावेळी उपस्थित जन समुदायाने एकमेकांस ईदच्या शुभेच्छा दिल्या.अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ,डी सी पी सीमा लाटकर,आमदार फिरोज सेठ,राजू सेठ आदी यावेळी उपस्थित होते.