Thursday, January 23, 2025

/

कारभार गल्ली वडगाव येथे महिलांच्या स्पर्धा उ

 belgaum

KArbhar galliसार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कारभार गल्ली वडगाव यांच्यावतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आले .जया स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने परिसरातील महिला वर्गाने सहभाग घेतला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी उखाने घेणे टिकल्या लावणे लिंबू चमचा संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या .कारभार गल्ली वडगाव या गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी 51 वे वर्ष असल्याने भरगच्च कार्यक्रम महिलांसाठी मंडळाने राबविले
. महिला वर्गाबरोबर लहान मुलांनी आकर्षक नृत्य गायनाचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली .सौ सुनीता कुंडेकर यांना भाग्यवान महिला किताब देण्यात आला .त्याचबरोबर त्यांची खणा नारळाने ओटी भरून गुलाबाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कविता फडके व ज्योती किल्लेकर यांनी केले .आभारप्रदर्शन सौ प्रियांका बाळेकुंद्री यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनामिका शिंदे एकता मुगळीकर वैष्णवी सप्रे चंद्रभागा बसरीकट्टी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.