वडील सेक्युरिटी गार्ड,घरात पाच जणांचं कुटुंब,भाड्याच्या घरात राहून कुटुंबाची आर्थिक परवड होत असताना ऑटोमोबाईल इंजिनियर होण्यासाठी धडपड सुरू आहे.सरकारी कोट्यातून जागा मिळाली मात्र फी भरण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण मुकण्याची अवस्था आली आहे योगेश आनंदाचे नावाच्या इंजिनियरिंगच्या विध्यार्थ्याची…
नाव योगेश आनंदाचे,वडिलांचे नाव राजेश आनंदाचे ,काम सेक्युरिटी गार्ड नोकरी, भाड्याच्या घरात श्रीनगर बेळगाव येथे वास्तव्य.
वरील माहिती असणाऱ्या या विध्यार्थ्याची परवड केवळ गरिबीमुळे होत आहे.
मराठा मंडळ इंग्लिश मिडीयम शाळेत दहावीत 75 टक्के गुण मिळवून याच संस्थेत डिप्लोमा ऑटो मोबाईलसाठी त्याने प्रवेश मिळवला, डिप्लोमाचे सहा सेमिष्टर देखील 72 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला . पुढे मेकॅनिकल इंजिनयरिंग साठी सरकारी कोट्यातून जागा मिळाली मात्र फी भरण्यासाठी 55 हजार रुपये कमी पडत असल्याने एक संधी निघून गेली आता दुसऱ्या राऊंड मध्ये एक संधी चालून आली आहे इथं ऑटोमोबाईल इंजिनियर साठी सरकारी सीट मिळाली आहे केवळ मराठा मंडळ कॉलेज आहे मात्र फी भरण्यासाठी त्याच्याकडे 55 हजार रुपये नाहीत. त्याच्या इंजनियरिंग शिक्षणासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
4 सप्टेंबर पर्यंत त्याला ही रक्कम नाही मिळाल्यास इंजिनियर होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच रहाणार आहे.
बेळगाव live पुन्हा एकदा डिस्टिंग्शन मध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यास शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यास आर्थिक मदत करा असे आवाहन करत आहे.
योगेश राजेश आनंदाचे
मोबाईल 08970462692