पंतप्रधान नरेंद्र मोदी हुबळी किंवा बेळगावच्या खासदाराला मंत्रिपद देणार आहेत. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात एकतर खासदार अंगडी किंव्हा प्रल्हाद जोशी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तारात हे स्पष्ट होणार आहे.
राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे हे सुद्धा शर्यतीत होते. पण मोदींनी अंगडी किंवा जोशी यापैकी एक नाव निवडण्याचा निर्णय घेतला आहे. जोशींना मागील काही वर्षांपासून कोणतीच मुख्य भूमिका मिळाली नाही तर अंगडींनी सलग तीनवेळा काँग्रेसचा पाडाव करून खासदारकी मिळवली आहे. यामुळे या दोघांपैकी एकाच विचार केला जाणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हाद जोशी राज्य भाजपचे अध्यक्ष असल्याने यावेळी त्यांच्या ऐवजी सुरेश अंगडींनाच मंत्रीपद मिळू शकते. ते पद राज्यमंत्री दर्जाचे असेल. हे खरे ठरले तर अंगडी एक दोन दिवसात मंत्री पदाची शपथ घेऊ शकतील.लिंगायत कोट्यातून अंगडी यांना हे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकाला नवीन तीन मंत्री पद मिळणार असून असलेल्या एक कॅबिनेट मंत्री पद काढून घेतल जाणार आहे.कायदा मंत्री सदानंद गौडा यांचा पता कट करण्यात येणार असून त्यांची जागा शोभा करंदलाजे देण्यात येईल अशी देखील माहिती मिळत आहे तर बेळळारी चे खासदार बी श्री रामलू यांना देखील मंत्री पदाच तिकीट नक्की आहे.