बेळगाव शहरात बकरी ईद दिना निमित्त होणाऱ्या गो- हत्या वर बंदी आणावी अशी मागणी उत्तर भाजपने केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
गो- हत्या करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी कसाई खाण्यात डांबून ठेवण्यात आलेल्या गायींना त्वरित मुक्त करावे अशा आशयाचे निवेदन म्हटलं आहे. निवेदनाचा स्विकार करुन पोलीस आयुक्त टि. जी. कृष्णाभट्ट यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उत्तर भाजप अध्यक्ष श्रीनिवास बिसनकोप,भाजप नेते किरण जाधव अनुप काटे. विक्रम किल्लेकर. रोहन जाधव. प्रतिक कारेकर. संतोष हलगेकर. तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.