शिवाजीनगर येथील नगरसेविका मीनाक्षी चिगरे आणि शिवाजी नगर येथील पंच पांडुरंग चिगरे गुरुजी यांच्या मालकीची शिवाजी नगर दुसरी गल्ली येथील घरची भिंत कोसळली आहे.
चिगरे कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना पहाटे पाच वाजता घराची एका बाजूची संपूर्ण भिंत कोसळली. या घटनेते चिगरे कुटुंबियांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. पण यामुळे त्यांचे अंदाजे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चिगरे यांच्या घरच्या बाजूला एक घरकाम सुरू आहे त्याच पाणी चिगरे यांच्या जुन्या घरात झिरपल्याने सदर दोन मजली घरची भिंत कोसळली आहे.चिगरे यांच्या घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, या दुर्घटनेत गणेशमूर्तीला कोणताही धक्का लागलेला नाही.
भिंत कोसळल्यामुळे चिगरे यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, तिजोरी व अन्य प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
शिवाजीनगर येथील दुसऱ्या गल्लीत त्यांचे घर आहे. ते घर जुने आहे, गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसात घराची एका बाजूची भिंत भिजली होती. पण ती भिंत कोसळेल असे चिगरे कुटुंबियाना वाटले नव्हते. पण शुक्रवारी पहाटे पाच वाजता अचानक भिंत कोसळली.