मंड्याचे जिल्हाधिकारी जिया उल्ला हे बेळगावचे नवीन जिल्हाधिकारी होणार आहेत बुधवारी राज्य शासनाने असा आदेश दिला आहे. मंजुश्री एन या मंड्या डी सी बनविण्यात आले आहे. जिया उल्ला हे बेळगाव चे डी सी होतील अशी बातमी या अगोदर बेळगाव live ने दिली होती राज्य सरकार च्या आदेशा नंतर बेळगाव live ची बातमी खरी ठरली आहे.
जिया उल्ला हे सध्या मंडयाचे जिल्हाधिकारी होते 13 आगष्ट 2016 पदावर आहेत.1999 मध्ये जिया उल्ला यांनी चिकोडी ए सी म्हणून सेवा बजावली होती.1997 बॅच चे के ए एस अधिकारी असलेल्या जिया उल्ला हे प्रमोटेड आय ए एस आहेत. हेच आता एन जयराम यांचे उत्तराधिकारी असतील
गेल्या चार दिवसांपूर्वी जि पं सी इ ओ रामचंद्रन यांनी प्रभारी जिल्हाधिकारी म्हणुन कार्यभार स्वीकारला होता आता जिया उल्ला हे नवे फुल्ल टाईम जिल्हाधिकारी असतील.