Monday, December 23, 2024

/

निर्णय क्षमता वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

निर्णय घेण्याची खमता नसणे या प्रकारच्या व्यक्तीचे जीवन फारच क्लेशमय झालेले असते. सतत होय किंवा नाही या व्दंव्दामुळे नेमकी कोणतीही गोष्ट त्यांना करता येत नाही. याचा परिणाम यांच्या कार्यक्षमतेवर होतो. हे लोक स्वतः फारच अस्वस्थ असतात. कारण कोणतीच गोष्ट यांच्या मनाला येत नाही. या अवस्थेमुळे ते सततची बेचैनी अनुभवत असतात. अनेकदा या लोकांचे वागणेदेखील दोन टोकाचे असते. आज आपल्याशी हसून खेळून वागले म्हणून उद्या ते तसे करतीलच असे नाही. त्यांचे मूड देखील तसेच झरझर बदलत असतात. कधी अगदी छान मूड असतो तर दुसर्‍या क्षणी यांचा मूड अगदी टोकाला गेलेला असतो. या प्रकारचे लोक बेभरवशाचे असतात. एखाद्याला दिलेल्या वेळेत कधीही येऊ शकत नाहीत. त्यासाठी अगदी कोणतीही न पटणारी कारणे देतात. दिलेली वेळ पाळावी किंवा नाही ही त्यांची खरी समस्या असते. एखादी गोष्ट केल्यावर ती पुनः पुन्हा केली की नाही हे तपासून पाहण्याची सवय असते. उदा. गॅस बंद केला की नाही, कुलूप व्यवस्थित लागले की नाही इ

dr sonali sarnobat
अशा अस्थिर व चंचल वृत्तीमुळे या व्यक्तींमध्ये एकाग्र होण्याची, निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते. मन सारखे इकडे तिकडे भरकटत असते. म्हणून एकाग्रता वाढवण्यासाठी होमिओपॅथी व पुष्पौषधीचा वापर केला जातो. ज्या मुलांना अभ्यासात गती कमी आहे अशांसाठी एकाग्रता वाढवण्याकरिता पुष्पौषधींचा वापर करता येतो.
काही व्यक्तींना आपल्याला काय होतंय हे नेमकं सांगता येत नाही. कधी त्यांना वाटते की आपल्या शरीरामध्येच दोष आहे तर कधी वाटते की आपल्या मनामध्ये दोष आहे. त्यांच्या वृत्तीप्रमाणेच त्यांचे विकार असतात. कधी शौचाला न होणे तर कधी पोट बिघडून जुलाब होणे. काही वेळा अगदी गरम होणे तर एकदम थंडी वाजणे, कधी एकदम भूक लागणे किंवा भूकच न लागणेइ. वयात येणार्‍या अस्थिर चंचल मुलामुलींसाठी अशा पुष्पौषधी तर फार उपयोगी पडतात. काही मुला मुलींना सारखे कपडे बदलण्याची किंवा सारखेच पाय हलवण्याची सवय असते. एकाग्रता कमी असण्याचे हे लक्षण आहे. अठ्ठावीस वर्षाचा एक अगदी होतकरू मुलगा. त्याचे नाव आपण म्हणू संतोष. लहानपणापासून निर्णय क्षमता कमीच! त्याची आई त्याला कायम सावरून घ्यायची. जाऊ दे! राहू दे! असं करतच शिक्षण जेमतेम पार पडलं. परंतु साहेब एकही नोकरी व्यवसाय धड करेनात. एक नोकरी करता करता दुसरी ऑफर आली की सोडली पहिली नोकरी. कोणी मित्र म्हणाला, व्यवसाय करूया, केलीच यांनी सुरूवात सहा सात वर्षे हाच प्रकार चालला होता. त्यामुळे संतोष कोठेबही स्थिर नव्हता. ठराविक मिळकत नव्हती. कोणावर किती विश्‍वास ठेवावा याची अक्कल नव्हती. त्याचे वडील तर त्याच्यासमोर पुरते हतबल झाले होते.
खुद्द संतोषशी बोलल्यावर तो म्हणाला की डॉक्टर मला नेमका निर्णयच घेता येत नाही. समोरचा माणूस सांगतो ते सगळं खरंच वाटायला लागतं. एखादा निर्णय घेतला की तो चुकीचा आहे, असे दुसरे मन म्हणायला लागते आणि माझ्या मनात व्दंव्द निर्माण होते. हे योग्य की अयोग्य हेच समजत नाही. त्यामुळे काहीच निर्णय ंघ्यायला नको असे वाटते. त्यामुळे नोकरी व्यवसायात कायम तोटाच होतो. धरसोड वृत्ती उफाळून येेते. आज आपल्यासमोर अशी कितीतरी उदाहरणं दिसून येतात अशा व्यक्तींनी वेळीच आपला प्रॉब्लेम ओळखून पुष्पौषधीची ट्रीटमेंट घेतल्यास निदान भविष्यकाळ तरी उज्वल होईल.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.