प्रत्येक बातमी सुन्न करणारी असते . अशीच बातमी आलेय ती म्हणजे मेडिकलच शिक्षण घेणाऱ्या मोजममाची…. ऑटोनगर येथील रुरल आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला परीक्षेस बसायला देण्यास कॉलेज प्रशासनाने टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे पैशाच्या लोभापायी कॉलेज प्रशासनाची संवेदनशीलता हरवली आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय.
मोजममा चारोलिया अस जिद्दीने संघर्ष करणाऱ्या 21 वर्षीय युवतीच नाव आहे.मूळच्या गुजरात च्या असलेल्या या युवतीने गेल्या तीन वर्षांपूर्वी ऑटो नगर येथील रूरल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मध्ये अॕडमीशन मिळवलं होत. त्यावेळी, तिचे वडील आखातात व्यवसाय निमित्य होते पाहिलं वर्ष उत्तीर्ण झाल्यावर वडील आखातात व्यवसायात नुकसान झाल्याने भारतात आले होते. गुजरात मध्ये तिच्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला आल्याने दुसऱ्या वर्षी तिच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि इथूनच सुरू झाली होती तिची संघर्षाची कहाणी ….गुजरात मधली मुजममा एकटीच शिक्षणासाठी बेळगावला आली होती पहिल्या वर्षाचा खर्च वडीलांनी दिला होता . मात्र, दुसऱ्या वर्षी घरच्या हलाखीच्या परिस्थिती वर कसही करून शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं होतं.ऑटो नगर मधील कॉलेज समोरच्या एका घरात तिने खोली भाड्याने घेतली होती. तीच भाडं थकल होत. केवळ 20 रुपये देऊन दोन रोटी विकत आणून खात होती . घर मालकाच्या मनात संशय आला . हिची बोलण्याची लकब का बदलली ? दिवसेंदिवस का बारीक होत आहे ? म्हणून विचारपूस केली असता तब्बल सहा महिने फक्त एक वेळ जेवण करत होती केवळ 20 रुपयात दोन रोटी आणून दोन दिवस काढत होती स्वयंपाक करत नव्हती . शेवटी त्या घर मालकांनं ऑटो नगरमधील सर्व धर्मीय पंचाना बोलवून कल्पना दिली. स्थानिक लोकांनी तिची विचारपूस करून बेळगावातील मुख्य मुस्लिम जमात समोर हा प्रश्न ठेवला असता तिची दुसऱ्या वर्षाची फी मुस्लिम जमातनं भरून शिक्षण सुरूच ठेवलं आहे.
रुरल मेडिकल कॉलेज मध्ये मुजममा सह केवळ दोनच विध्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या होत्या . कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुरल मेडिकल कॉलेज मधील सगळ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेज मध्ये अडमिशन घ्या असा आदेश बजावला होता त्यामुळं सगळे जण दुसऱ्या कॉलेजला गेले तसच करत उत्तीर्ण झालेल्या या दोन मुलीनी देखील तिसऱ्या वर्षा साठी रूरल मेडिकल कॉलेज मधून ट्रान्सफर एन ओ सी घेतली सदर एन ओ सी साठी घेण्यासाठी मुस्लिम जमात ने लोक वर्गणी तुन 25 हजार रुपये मुजममा साठी रुरल मेडिकल कॉलेज प्रशासनाला दिले.या नंतर मुजममाने राजीव गांधी विश्वविध्यालयाकडे तिसरी वर्ष अन्य कॉलेज अडमिशन परवानगी मागितली त्यावेळी राजीव गांधी विश्वविद्यालयाने त्याच कॉलेज मधून परिक्षा फॉर्म भरा अशी सूचना केली. त्यावेळी परीक्षा अर्ज मागायला गेल्यास संस्थेचे अध्यक्ष के डी देशपांडे यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली आहे अस तिच म्हणणं आहे.
अश्या या गरीब विद्यार्थिनीला केवळ पैश्या साठी कॉलेज कडून गळचेपी केली जात आहे.परीक्षा अर्जाची अंतिम तारीख 15 आगष्ट पर्यंत आहे .सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे,जमीर हनचिन्मनी,अफजल टिनवाले,फैजुला माडीवले, सुनील जाधव, नारायण सावंत,सुजित मूलगुंद जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सदर विध्यर्थिनी वरील अन्याय दूर करा अशी मागणी करण्यात येणार आहे…. अशा लढवय्या विद्यार्थीनीसाठी समाजातील दातृत्वाचे हात मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे. बेळगाव live देखील आवाहन करत आहे.
एकिकडे शिकायची प्रचंड जिद्द आणि दुसरीकडे हालाकीची परिस्थिती .. त्यामुळ, या जिद्दीला वाट करून देण हे समाजाच कर्तव्य आहे.मदतीसाठी मोबाईल नंबर आहे -9632414534