-शनिवार दि.१९ ऑगस्ट रोजी श्रावण मासातील शनी प्रदोष आहे. त्या निमित्त पाटील गल्ली येथील शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण मासातील शनी प्रदोष अत्यंत महत्वाचा मानला जातो.त्या दिवशी शनी प्रदोष व्रत केल्यास दोष,पीडा नष्ट होतात.प्रदोष व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी उपवास करावा. ज्यांना उपवास करणे शक्य नसेल त्यांनी शनीचे भक्तिभावाने दर्शन घ्यावे.
श्रावण शनिवार निमित्त सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत तैलभिषेक करण्यात येतील.शनी प्रदोष निमित्त सायंकाळी चार ते सात या वेळेत विशेष तैलभिषेक करण्यात येतील.
शनी प्रदोष निमित्त मंदिरात दिवसभर प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ वाजता पालखी सेवा होणार आहे.