Tuesday, February 18, 2025

/

वर्षभर सामाजिक बांधिलकी जपणारं  भांदुर गल्ली गणेश मंडळ

 belgaum

गणेश उत्सवात केवळ 11 दिवस सामाजिक कार्य न करता वर्ष भर समाज कार्याचा वसा चालवत आलेल्या भांदुर गल्लीतील गणेश मंडळास 75 वर्ष पूर्ण झाली आहेत .

75 वर्षा पूर्वी गल्लीतील पंचानी या गणेश मंडळाची स्थापना केली होती मात्र गेल्या 18 वर्षा पासून या मंडळाने खऱ्या अर्थाने लोकमान्य भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे.श्रावणातील मंदिरातील दूध नासाडी जनजागृती,महिला रोजगार,रक्तदान शिबिर ,भाजी भाकरी विक्री केंद्र सुरू करणे, शैक्षणिक मदत अशी कार्ये करत बेळगाव शहरातील आदर्श गणेश मंडळ म्हणून समोर आलं आहे.Bhandur galliदूध आणि रक्त तयार करणार यंत्र कोणत्याच शास्त्रज्ञाने बनवलं नसून दूध हे तर धरतीवरचं अमृत आहे याचं भान ओळखून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कपिलेश्वर मंदिरात दूध नासाडी बद्दल जन जागृती करत हजारो लिटर दुध गटारीत जाण्या ऐवजी सिद्धार्थ बोर्डिंग आणि प्रज्वल सारख्या संस्थांना वितरित केलं आहे.
मंडळात महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेलं महत्वाचं मंडळ असून निर्णय प्रक्रियेत महिलांचा देखील सहभाग असतो गेली 18 वर्ष रक्तदान शिबिर घेत असताना अनेक महिला देखील हिरीरीने रक्तदान करत असतात.

असा दिला रोजगार

गल्लीतील गरीब आणि विधवा कडून,ज्यांचं उत्पन्न कमी असतं अश्या कडून मंडळ देणगी घेत नाही.  मंडळाचे अध्यक्ष उद्योजक महादेव चौगुले यांनी स्वतःच्या खर्चाने दोन महिलांना शिलाई मशीन दिली त्यानंतर आता पर्यंत मंडळाने 40 शिलाई मशीन वाटप केलं आहे.  रोजगार देऊन स्वावलंबी बनवलं आहे या शिवाय पाच वर्षा पूर्वी गरजू महिलांना भाजी भाकरी विक्री केंद्र सुरू करून दिलंय आता त्या महिला ऑर्डर नुसार   काम करत असतात.मंडळाच्या वतीने दर वर्षी सिद्धार्थ बोर्डिंग आणि प्रज्वल सारख्या संस्थाना 25 हजार रुपया पर्यंत अन्न धान्य वितरित केलं जातंBhandur galli

दरवर्षी गल्लीतील 60 ते 70 विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते गुणवंतांचा सत्कार केला जातो शिक्षणावर आधारित व्याख्याने दिली जातात.या वर्षी पासून मुलींना सेल्फ डिफेन्स कराटे प्रशिक्षण क्लास घेतला जाणार आहे.

चतुर्थी दिवशी सार्वजनिक गणेश उत्सवाची गडबड लक्षात घेता मागील वर्षी पासून दोन दिवस अगोदर गणेश आगमन मिरवणूक काढली जाते चतुर्थी दिवशी 7 ते 8 त वेळेत महा आरतीत वृद्ध व महिला हजारोच्या संख्येने सहभागी होत असतात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.