बेळगाव रेल्वे स्टेशन वर प्रवासी,इतर ये जा करणाऱ्याना माहिती विचारणाऱ्यांना हेल्पलाईन म्हणून परिचित सोनी जॉर्ज (उप मुख्य तिकीट निरीक्षक रेल्वे) वय 45 यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे.
बेळगावातील लेक व्यु इस्पितळात त्यांच आजाराने निधन झालं असून त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.ते मूळचे केरळ चे असून गेल्या 25 वर्षा पासून बेळगावला नोकरी निमित्य स्थायिक होते उद्या (बुधवारी) बंगळुरू येथे आईच्या घरी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. सोनी जॉर्ज हे उप मुख्य तिकीट निरीक्षक या पदावर बेळगाव रेल्वे स्थानकावरच कार्यरत होते. अत्यंत चांगल्या आणि मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं.रेल्वे स्टेशन वर कुणीही कधीही कसली माहिती विचारायला आले की ते प्रत्येकाला आपुलकीने समजावून सांगत असत माहिती देत असत मनमिळावू स्वभावाने त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील मन जिंकल होत.अचानक सोनी जॉर्ज यांच्या निधनाने बेळगाव रेल्वे स्टेशन वरील मदतकर्त्या टी सी ची पोकळी निर्माण झाली आहे.अनेक जण सोनी आठवण काढत आहेत अश्या या कर्तव्य दक्ष रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना…