पोलीस आयुक्त कृष्णभट्ट यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहावर छापा घालून तपासणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 50 पेक्षा अधिक सहाय्यक पोलिसांनी कारवाईत सहभाग दर्शविला होता.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईत मोबाईल संच, गांजासह अन्य वस्तू या दरम्यान जप्त करण्यात आले आहेत
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी, एसीपी पोलीस निरीक्षकांचा मोठा ताफा या कारवाई त सहभागी झाला होता अधिक संख्येने पोलिसांनी कारवाई केल्यामुळे याची एकच चर्चा सुरु आहे. तसेच आज अचानक भेट देऊन प्रत्येक बराक आणि येथील परिसर पोलिसांनी पिंजून काढले आहे. कारवाई करून तपासणी करणे, हा उद्देश होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली असली यामागे काही कैद्यांची चौकशी करण्यात आली आहे अशी देखील माहिती मिळाली आहे.
याबाबत सायंकाळी पोलीस अधिक माहिती देणार आहेत