उध्यापासून बेळगावात 12 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवासाठी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त दोन टप्प्यात करणार आहोत अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी दिली आहे.
बंदोबस्तासाठी बाहेरील जिल्ह्यातून पोलीस कुमक मागवण्यात आली असून पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात 4 डी सी पी 18 ए सी पी ,64 सी पी आय,98 ए पी आय,270 ए एस आय,2722 पोलिस,75 महिला पोलीस,850 होम गार्ड असे एकूण 4102 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
बाहेरील जिल्ह्यातून 2 एस पी,14 डी एस पी,44 सी पी आय,78 पी एस आय,180 ए एस आय,2245 पोलीस,850 होम गार्ड असे 3413 पोलीस कर्मचारी असे दोन्ही मिळून 7500 जणांचा बंदोबस्त असणार आहे.10 के एस आर पी तर दोन सी ए आर प्लाटून बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
महा पालिका, हेस्कॉम, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचं सहकार्य मिळत आहे मंडळाना परवानगी साठी सिंगल विंडो सिस्टम चालू करण्यात आली आहे. सतत 12 दिवस चिता वाहनाची पेट्रोलिंग,फूट पेट्रोलिंग तैनात करण्यात आले आहेत. शहरात 10 ठिकाणी चेक पोस्ट देखील तैनात करण्यात आली आहेत.पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,अमरनाथ रेड्डी उपस्थित होते