बेळगाव शहरात ३५७ गणेशोत्सव मंडळे आहेत, त्यांना वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात, यासाठी लाईट, मिरवणूक मार्ग, ध्वनिक्षेपक, मंटप यासाठी पोलीस स्टेशन, महापालिका, हेस्कॉम, यांच्याकडून परवानग्या घ्याव्या लागतात त्या सर्व परवानग्या त्या त्या विभागातील पोलीस स्टेशन मधून मिळतील अशी ग्वाही डीसीपी सीमा लाटकर यांनी दिली.
महापौर संज्योत बांदेकर यांनी महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, हेस्कॉमचे अधिकारी, फॉरेस्टचे अधिकारी व मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे अध्यक्ष ,मराठी भाषिक गटाचे गटनेते,विरोधी गटाचे गटनेते यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत डीसीपी सीमा लाटकर बोलत होत्या,
महापौर संज्योत बांदेकर यांनी स्वागत केले, आणि बेरड समाजातील थोर साहित्यिक भीमराव गस्ती यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहून बैठकीला सुरुवात झाली.
यावेळी आयुक्त शशिधर कुरेर, महामंडळाचे अध्यक्ष आमदार संभाजी पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, व्यासपीठावर होते,
विकास कलघटगी यांनी महामंडळाच्या मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले, यावर चर्चा झाली हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षातील थकित बिलाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर आमदार संभाजी पाटील यांनी महापौराना हे बिल महापालिकेने भरावे असे सांगितले.
यावेळी नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, मदन बामणे, गणेश दड्डीकर, आरोग्य समितीचे अध्यक्ष राजेंद्र बिर्जे, दीपक जमखंडी, अर्थ समितीचे अध्यक्ष संजय सव्वाशेरी, यांनी विविध सूचना केल्या.
आर एस नाईक यांनी आभार मानले.
विसर्जन मार्गाची पहाणी
अधिकारी आमदार महापौरांनी विसर्जन मार्गाची पहाणी केली.
पाहणी दौऱ्यात रेणुका हॉटेल परिसरात होणाऱ्या अडचणी लक्षात आणून दिल्या, पर्यायी रस्त्याची पण पाहणी केलीरजपूत समाजाबरोबर बोलणी करण्याचे ठरले
बातमी सौजन्य-महादेव पाटील