जुने बेळगाव नजीक बळळारी नाल्यामध्ये अतिक्रमण करून सुरु असलेले बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .आमदार संभाजी पाटील , शहर अभियंता निपाणीकर यांनी पाहणी केली आणि जो पर्यन्त प्रशासन निर्णय घेत नाही तो पर्यन्त काम बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यानी हा नाला अतिक्रमण बाबत सातत्याने विरोध करून देखील काम सुरूच ठेवण्यात आले होते आज आमदार संभाजी पाटील यांनी पहाणी केली यावेळी शेतकऱ्यांनी अतिक्रमण प्रचंड विरोध केला त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यानी आणि आमदारांनी काम बंद करा असा आदेश दिला.
शेतकरी हे अतिक्रमण हटवण्यासाठी कित्येक दिवस लढत आहेत आमदार पाटील यांच्याकडे देखील त्यांनी विनंती केली होती त्यानुसार अधिकाऱ्या सह पहाणी करण्यात आली.नाल्यासाठी जमीन सोडली असताना अतिक्रमण करणं चुकीचं असून धोंगडी नाल्यात अतिक्रमण चुकीचं आहे सरकार अनुमती दिली तरी आम्ही बांधकाम पाडवु अशी भूमिका घेतल्यावर आमदार पाटील यांनी धोंगडी यांना सर्व कागदपत्रे परवानगी पत्र आणावयास सांगितली यावर अधिकारी शेतकरी बैठकीत निर्णय होत नाही तोवर बांधकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अतिक्रमित जमिनीची जन हितासाठी नुकसान भरपाई देऊन हा वाद मिटविला जाईल अशी देखील यावेळी चर्चा करण्यात आली.दोन दिवसात हा प्रश्न सोडवू अशी भूमिका देखील आमदार पाटील यांनी यावेळी घेतली.