किरण ठाकूर यांनी सुरू केलेल्या लोकमान्य चे काम मोठे आहे या संस्थेच्या माध्यमातून किरण ठाकूर हे एक प्रकारे देश सेवा करत असून साऱ्यांनी यांचे हात बळकट करण्याची गरज आहे अस मत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.बेळगावातील मराठा मंदिर सभागृहात आयोजित लोकमान्य संस्थेच्या स्थापना विशेषांक पुस्तिकेचे प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाल्या नंतर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर संज्योत बांदेकर, लोकमान्य संस्था प्रमुख किरण ठाकूर, संचालक पंढरी परब आदी उपस्थित होते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग प्रत्येकाने शोधला पाहिजे तास लोकमान्य संस्थेचे कार्य गरुड भरारी सारख आहे अश्या संस्था उभ्या राहिल्या कि नक्कीच देश मजबूत होण्यास मदत होणार आहे अश्या संस्था मुळेच देशाची अखंडता टिकून राहते अस देखील ते पुढे म्हणाले.
बेळगावात आणि गोव्यात प्रामाणि प्रेमळ स्वभावाचे लोक आहेत त्यामुळे या भागात संस्था वाढली आहे दिल्लीत सारख्या ठिकाणी संस्था सांभाळणे जोखमेच काम आहे ते ठाकुरांनी हाती घेतलय असेही ते म्हणाले .
महापौर संज्योत बांदेकर यावेळी बोलताना म्हणाल्या की बेळगावातील लोकमान्य साठी आम्ही सर्वाना हात भर लावला पाहिजे ३ हजार कोटी ठेवी जमा करणे हे साध्या माणसाच्या हातून घडणारे कार्य नव्हे या साठी महान पुरुषच लागतात.