गेली 100 वर्षांहून अधिक काळ लष्कराच्या वतीनं चालवण्यात येणार बेळगावातील आर्मी डेअरी फार्म आता बंद होणार आहे. केंद्रीय संरक्षण खात्याने देशातील सर्व डेअरी फार्म आता बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे बेळगावसह देशातील 39 डेअरी फार्म आता आगामी तीन महिन्यात बंद होणार आहे.
बेळगावात देशातील सर्वात मोठा दुसरा मोठा डेअरी फार्म 1890 मध्ये अलाहाबाद नंतर बेळगाव मध्ये स्थापित करण्यात आला होता. कॅम्प मध्ये बेळगाव राकसकोप रोड वर गणेशपूर येथे हे डेअरी फार्म आहे.
गेल्या 127 वर्षा पासून या बेळगावातील सैन्य फार्म मधून लागणार दूध मराठा सेंटर आर्मी बेस आणि एअर फोर्स स्टेशन ला पुरविण्यात येत आहे.
कॅम्प मधील सैन्याच्या खुल्या जागेत पसरलेल्या या डेअरी फार्म मध्ये 640 जनावर आहेत 50 जणांचा यावर रोजगार देखील आहे.या शिवाय गवत कापणे वगैरे कामासाठी मोसमात 300 लोकांना रोजगार असतो.
गेल्या पाच वर्षां पासुन देशातील हे सैन्य डेअरी फार्म बंद करण्याचा प्रस्ताव होता त्याचा निर्णय आता झाला आहे.गेल्या पाच वर्षांपूर्वी प्राणी दया संघटनांच्या माध्यमातुन मेनका गांधी यांच्या पुढाकाराने सैन्य फार्म बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता आता पुन्हा हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.