तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतील दोन्ही गटातील अनेक कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.काही जणांनी अधिकृत प्रवेश केलाय काही जण हित संबंध ठेऊन आहेत तर काही जण काँग्रेस मध्ये प्रवेश करायच्या उंबरठ्यावर आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ची जवळीक समितीला आगामी विधान सभेत महागात पडण्याची शक्यता आहे.अश्या या सगळ्या देवाण घेवाण आणि हित संबंधामुळे आगामी निवडणुकीत खरोखर समिती विजयासाठी प्रयत्न करणार की एकमेकांना पूरक राजकारण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिम भागातील अनेक नेत्यांनी, समितीत कार्यरत एक दलित नेत्याने,चिटणीस पद भोगलेल्याने,माजी तालुका पंचायत सदस्यांने रक्षा बंधन कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता.सुळगा भागातील अनेक समिती नेते नेहमी मागे फिरत असतात जवळीक साधत असतात मध्यवर्ती कार्याध्यक्षांच्या जवळ असलेला एक ग्राम पंचायत अध्यक्ष तर नेहमीच हेब्बाळकरांचा उदो उदो करत असतो.अनेक युवक कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत त्यांना वेळीच आवरणे गरजेचं असून बेळगाव live ने युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या अशी मागणी केली असताना समितीचे अनेक जण राष्ट्रीय पक्षांच्या वाटेवर आहेत.ते राष्ट्रीय पक्षाकडे का जात आहेत नेतृत्व चुकतंय का हेवेदावे याला कारणीभूत आहेत याचा देखील विचार झाला पाहिजे.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर समिती नेत्याकडून राष्ट्रीय पक्षा कडून मदत म्हणजे मराठी माणसाचा घात आहे वेळीच आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा समितीच्या जीवा वर पद भोगलेल्याना ,मोठं झालेल्यांना हुतात्म्यांचा शाप लागल्या शिवाय रहाणार नाही.
CHOR SAALE
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते कांँग्रेस पक्षाची हुजरेगिरी करण्यात मग्न आहेत. कारण म्हणजे म ए समितीचे नेतेच या राष्ट्रीय पक्षातील नेत्यांशी संपर्कात आहेत आणि त्यांचे सहकार्य सुध्दा त्या पक्षाच्या हितासाठीच चालू आहे. आणि हे आपले नेते कोण आहेत हे सर्वांना माहीत आहेच.आता वेळ आली आहे यांना अक्कल शिकवण्याची आणि हे काम तरुणांनी एकत्र येऊन करायला हवे.आणि हिच वेळ आहे तरुणांनी एकत्र येऊन समितीची पुनर्बांधणी करण्याची. आणि यात आपण पत्रकार तसेच वृत्तसेवा करणार्यांनी या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे.
Taluka samitimadhe unity naslyamule ,he asech honor saheb.. leaders jage vyalala pahijet,swarthipana bajula tevhayala pahije