सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारचे वकील कशी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आहेत बेळगाव प्रश्नी लवकर मराठी जनास न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री यांची खास बेळगाव प्रश्नी बैठक घेऊ अस ठोस आश्वासन महाराष्ट्राचे वन आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल आहे.
सोमवारी रात्री बेळगाव विमान तळावर मध्यवर्ती समितीच शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांची भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिलं आहे.
सोमवारी दुपारी ते नागपूर हुन कोल्हापूर दौऱ्याला खास विमानाने आले होते रात्री 11 वाजता कोल्हापूरचा कार्यक्रम आटोपून ते बेळगाव मार्गे मुंबईला रवाना झाले.यावेळी सीमा प्रश्नाचे समनवयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील देखील उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाच्या कामकाजा वेळी दिल्लीत होणाऱ्या जेष्ठ वकिलांच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने कायदा विभागाचा अधिकारी हजर करावा जेष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्र्यानी जेष्ठ वकिलांशी चर्चा करावी अशी विनंती देखील समिती शिष्टमंडळाने यावेळी केली. केंद्र सरकार नेहमी आपली भूमिका कशी बदलत आहे त्यासाठी महाराष्ट्राने सजग राहायला हवं अशी देखील माहिती देण्यात आली.
गेल्या आठवड्यात मुंनगटीवार यांनी सीमा भाग केंद्र शासित करा अस पत्र केंद्र सरकारला पाठवलं होत याची चर्चा देखील करण्यात आली.यावेळी आमदार अरविंद पाटील मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,अड राजाभाऊ पाटील,सुनील आनंदाचे,जगन्नाथ बिरजे,गोपाळराव देसाई,सुनील जाधव आदी उपस्थित होते.