माळी गल्ली भौगोलिक दृष्ट्या खूप लहान असली तरी गणेश उत्सव असोत किंवा शिव जयंती हे दोन्ही सण मोठ्या थाटात इथे साजरे केले जातात उत्साहाला सीमा नसते तसंच मंडळ किंवा गल्ली लहान असली तरी गणेश मंडळाची कीर्ती महान आहे.
एकेकाळी माळी गल्लीतील गणेश भक्त कार्यकर्ते कांदा मार्केट रविवार पेठ येथे जाऊन गणरायाची मंडपात जाऊन सेवा करत होते ते पाहून गल्लीतील वडीलधारी मंडळांनी बैठक बोलावली होती त्यावेळी त्या बैठकीत हिंदू मुस्लिम समाजातील बांधवांनी एकमुखी ठराव करून सर्वानुमते गणेशोत्सवाची स्थापना 1967 साली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तेंव्हा पासून हे मंडळ लागदार 50 वर्ष उत्साहाने गणपती उत्सव साजरा करत आहे.
पहिल्या वर्षी 6या गल्लीत बॅरलवर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होतीमुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेंव्हापासून श्री जोतिबा लगरकांडे, श्री परशराम वांद्रे, कै लक्ष्मणराव लगरकांडे
कै मनोहर भातकांडे, कै धाकलू ठोकणेकर, यांनी सुरवात केली. आजही याच घराण्यातील दुसऱ्या पिढी गणेशाचा उत्सवाचा धुरा सांभाळत आहेत.
यावर्षी मंडळाचे सुवर्णमहोत्सवात पदार्पणात करीत आहे या निमित्ताने गल्लीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 5 वर्षा पासून रक्तदान शिबीर, शालेय उपयोगी साहित्य वितरण , अनाथ आश्रमला धान्य मदत, आरोग्य शिबीर, अंगणवाडीला खुर्च्या मदत, तसेच अन्य सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत यामुळेच सलग दोन वर्षे लोकमान्यचे पहिले पारितोषिक विजेतेचा मान मिळाला आहे बेळगाव मधील ही गल्ली लहान पण कीर्ती महान आहे
यावर्षी मंडळाचे अध्यक्ष मेघन लगरकांडे हे आहेत.