लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी आणि जैन ,शीख समाजाप्रमाणे असणारे अधिकार द्यावेत या मागणीसाठी बेळगावात ठिकाणाहून आलेल्या पन्नास मठाधीशांच्या नेतृत्वाखाली महारॅली काढण्यात आली . महारॅलीत राज्यभरातून आलेले पन्नास हजारहून अधिक लिंगायत बांधव भगिनी सहभागी झाले होते .धर्मवीर संभाजी चौकातून निघालेल्या महारॅलीत गांधी टोपी घालून आणि हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते . लिंगराज कॉलेजच्या मैदानावर राज्यातून आलेल्या पन्नासहून अधिक मठाधीशांच्या आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत महारॅलीत सहभागी झालेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले . लिंगायत आणि वीरशैव धर्म हे वेगवेगळे आहेत . बाराव्या शतकात बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे . राज्य सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही मठाधीशानी प्रचंड जनसमुदायासमोर केले
गेल्या नऊशें वर्षांपासून आम्ही हिंदू धर्मापासुन वेगळे आहोत . आजही आम्ही हिंदू धर्माबाहेर आहोत . आम्ही हिंदुविरोधी नाही . आम्ही लिंगायतच आम्ही हिंदू नव्हे . संत बसवेश्वरांनी शिकवलेल्या शिकवणुकीमुळे अन्य धर्मियांनी देखील त्याकाळी लिंगायत धर्माचा स्वीकार केला होता . जैन ,शीख धर्मियांप्रमाणे लिंगायतांना देखील घटनात्मक हक्क मिळाले पाहिजेत अशी मागणी लिंगायत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त आय ए एस अधिकारी ए . एस . जामदार यांनी केली .
मराठा मोर्चा प्रमाणे लिंगायत मोर्चे-
महाराष्ट्रात मराठा आरक्षण साठी काढण्यात आलेल्या मोर्चा प्रमाणे लिंगायत समाजाला बसव धर्म अश्या वेगळ्या धर्माच्या दर्जासाठी लिंगायत मोर्चे काढण्यात येणार आहेत.3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील लातूर मध्ये या नंतर गुलबर्गा बिदर आणि मैसूर येथे देखील मोर्चे काढण्याची घोषणा या मोर्चात काढण्यात आली.