सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे बेळगाव महाराष्ट्रात जात असेल तर सर्वात पहिला भगवा झेंडा माझ्या हाती असेल आणि मीच जय महाराष्ट्र म्हणणारी मी पहिली असेन असे वक्तव्य केले आहे राज्य प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ..बेळगाव तालुक्यातील देसुर आणि बसरीकट्टी येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आगामी काही महिन्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हेबाबळकर या बेळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत ग्रामीण मतदार संघात मराठी भाषिकांची मत बहुसंख्य असल्याने मराठी मतदारांना खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असावे असा राजकीय विश्लेषकांच मत आहे.
सर्वात पहिला जय महाराष्ट्र म्हणू अस मराठी पोषक वक्तव्य केल्याने बेळगावातील राजकारणात खळबळ माजली असून कन्नड संघटना हेब्बाळकर यांच्या विरोधात आक्रमक बनल्या आहेत सर्वच प्रादेशिक वृत्त वाहिन्यांनी या बातमीला अग्रक्रम दिला आहे.
जय महाराष्ट्र या घोषणेवर नवीन विधेयक आणून बंदी आणू अशी भाषा करणाऱ्या काँग्रेस सरकार च्या जबाबदार महिला नेत्या कडून वक्तव्य हे वक्तव्य झाल्याने मराठी भाषिकांना खुश करण्याचा प्रयत्न आहे असे देखील बोलले जात आहे
एकीकडे मंत्री रोशन बेग जय महाराष्ट्र वर बंदी ची भाषा करतात तर दुसरीकडे त्याच पक्षातील हाय प्रोफाईल महिला नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर जय महाराष्ट्र म्हणू अस वक्तव्य करतात यात फक्त राजकारण आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.राज्य काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांना मराठीचा पुळका असेल तर त्यांनी भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार सीमा भागातील मराठी जणांना का सरकारी परीपत्रक मराठीत दिली नाही असा सवाल देखील एका नेत्याने केला आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर या मागील आमदारकी निवडणुकी पासून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आपली शक्ती पणाला लावत आहेत. यावेळी सीमाप्रश्ना चे राजकारण करून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे हेच दिसून आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ग्रामीण मधील तथाकथित नेते मंडळींना गळाला लावल्या नंतर आता सामान्य माणसाच्या बुद्धिभेदाचे राजकारण त्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे.
सध्या कन्नड माध्यमांनी त्यांचा जोरदार समाचार घेण्यास प्रारंभ केला असून याचा फायदा त्या घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, आता त्यांच्या या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा हे मराठी जनतेला ठरवावे लागेल.