सिटी बस कंडक्टरला एका ऑटो चालकाने लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना सी बी टी बस स्थानकाच्या एन्ट्री गेट वर मंगळवारी दुपारी घडली आहे.कंडक्टरला सोडवायला गेलेल्या एका के एस आर टी सी कर्मचाऱ्यास देखील सैराट ऑटो चालकाने मारहाण केली असून दोघेही या घटनेत जखमी झाले आहेत.
एस एस हिरेमठ आणि आय एफ मुजावर अस जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नाव आहेत. मारामारी करून ऑटो चालकाने घटनास्थळा वरून पोबारा केला यानंतर सदर ऑटो चालका वर कारवाई करा या मागणी साठी पोलीस स्थानका समोर निदर्शन केली. मार्केट पोलिसात फिर्याद नोंद झाली असून ऑटो चालकांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे