ज्युनियर टीम इंडिया च्या महिला खेळाडू काल पासून बेळगावातील ऑटो नगर मधल्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशन च्या मैदानावर प्रॅक्टिस करत घाम गाळत आहेत . या टीम इंडियाच्या मुलींना प्रोत्साहन देण्याचं काम बेळगाव पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी आहे . शुक्रवारी सकाळी देशाच्या काना कोपऱ्यातून बेळगावला दोन आठवड्याच्या क्रिकेट शिबिरासाठी आलेल्या १९ वर्षा खालील महिला भारतीय टीम च्या सदस्यांचं मनोबल वाढविल आहे .
ऑटो नगर येथील क्रिकेट स्टेडियम वर १७ आगष्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत तब्ब्ल दोन आठवडे हे शिबीर चालणार आहे भविष्यात मुख्य भारतीय टीम च नेतृत्व करणाऱ्या भावी खेळाडूंना सीमा लाटकर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं . एक महिला म्हणून कोणत्याही स्थितीत मनोधैर्य वाढवा खेळात जय पराजय असतात लढायला शिका खिलाडू वृत्ती जागवा असा आवाहनं त्यांनी यावेळी केलं . दिल्ली मुंबई आंध्रप्रदेश तामिळ गुजरात महाराष्ट्र आसाम बंगाल बिहार उत्तर प्रदेश पंजाब सह देशातील विविध भागातील २५ क्रिकेट खेळाडू सहभागी झाल्या आहेत .
बेळगावातील हे ऑटो नगर मधील स्टेडियम मध्ये शिबिरात नॅशनल क्रिकेट अकादमीचे ८ जणांचे प्रशिक्षक सपोर्टींग स्टाफ मार्गदर्शन करणार आहेत . बेळगाव स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष अविनाश पोतदार,युनियन जिमखानाचे प्रसन्न सुंठणकर ,के एस सी ए स्टेडियम बेळगाव मॅनेजर दीपक पवार , बेळगाव स्पोर्ट्स क्लबने चे बाळकृष्ण पाटील उपस्थित होते .