दंगल आणि सुलतान मुळे देशात कुस्तीची क्रेज वाढली आहे त्यामुळे कुस्तीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत.कुस्तीत कोणत्याही स्पर्धात चांगली संधी मिळणे गरजेचे असते .बेळगाव भागात कुस्तीचं टॅलेंट नाहीं अश्यातला भाग नाही टॅलेंट आहे मात्र गरज आहे ती संधीची … अशीच एक चांगली संधी एक पैलवान गमावतोय कि काय अशी अवस्था निर्माण झाली आहे तर चला जाणून घेऊ बेळगाव तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडूची व्यथा..
नाव अतुल शिरोळे गाव मुचंडी बेळगाव अशी या आंतरराष्ट्रीय कुस्ती पटटूची माहिती आहे . अत्यंत गरिब परिस्थितीत केवळ पोट पुरता उदर निर्वाहासाठी शेती असलेल्या शेतकरी कुटुंबातील जन्मलेला हा खेळाडू आर पी डी कॉलेजमध्ये शिकतो आहे . कुस्तीत अनेक राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पदक जिंकलेल्या या खेळाडूस तुर्कस्थान दौऱ्यास १ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे मात्र गरिबी मुळ आर्थिक त्याची परवड होताना दिसत आहे.आगामी 8 दिवसात काही न जमा केल्यास त्याचा तुर्कस्थान दौरा तो मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी अशाच लोक वर्गणीतुन अनेकांनी मदत केल्याने त्याने खेळाडूने जॉर्जिया येथे कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन कांस्य पदक पटकाविला होत आता यावर्षी पुन्हा त्याची १३ ते २४ सप्टेंबर या काळात अश्काबाट तुर्कस्थान येथे आशिया ऑलम्पिक कौन्सिल च्या वतीने आयोजित पाचव्या एशियन इनडोअर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
अतुल शिरोळे याने पाचवी ते दहावी पर्यंत जिल्हा आणि राज्य पातळीवर मातीतील कुस्त्यात चांगली कामगिरी केली आहे पी यु सी मध्ये मराठा मंडळ कॉलेजे मध्ये शिकताना जिल्हा आणि राज्य राष्ट्रीय पातळीवर देखील चमकदार कामगिरी केली होती १२ वीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा चॅम्पियन म्हणून गौरव करण्यात आला होता त्या नंतर त्याने डिग्री साठी आर पी डी मध्ये प्रवेश मिळवला या कॉलेज मधून त्याने पुणे ,दिल्ली, पंजाब ,नागालँड ,मणिपूर मध्ये कुस्ती स्पर्धात प्रथम क्रमांक मिळवला होता या यशामुळे त्याची मागील वर्षी जॉर्जिया येथील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती तिथे त्याने पोलंड, कुकरेज, आणि बेलारूस च्या पैलवान हरवत कास्य पदक मिळवलं होत. सेमी फायनल मध्ये दुखापतीमुळं त्याचा पराभव झाला होता . या वर्षी देखील त्याची तुर्कस्थान मध्ये आशिया स्पर्धे साठी निवड झाली आहे
मागील दौऱयावेळी आई बहिणीचं गंटन बँकेत गहाण ठेऊन पैसे एकत्रित केले होते काही समाजसेवी नी मदत केल्यावर दागिने परत सोडवून घेतले अशीही माहिती मिळाली आहे दोन महिन्या पूर्वी घरचा उदर निर्वाह करण्यासाठी गवंडी कामाची मोलमजुरी करणारे अतुल चे वडील सुरेश यांनी आपल्या मुलाच्या सरावा खुराक साठी घरातील म्हैस विकल्याचे माहिती त्याने पत्रकारांना दिली होती त्यानंतर मागील महिन्यात बेळगाव पत्रकार विकास अकादमी ने त्यास १० हजारांची आर्थिक मदत दिली होती.
तुर्कस्थान दौऱ्यासाठी सुरुवातीला मदत मिळणे कठीण आहे स्पर्धा जिंकून आल्यावर मदत करण्याचं आश्वासन कॉलेजे प्रशासनाने दिले आहे अशी माहिती शिरोळे याने बेळगाव live कडे दिली आहे .
मुचंडी सारख्या खेड्यात जन्म घेऊन कुस्ती मध्ये ऑलम्पिक मेडल जिंकण्याचा ध्येय उराशी बाळगलेल्या या तरुणास तुर्कस्थान दौऱ्यास सढळ हस्ते आर्थिक मदत करावी असं आवाहन बेळगाव live करत आहे . तुमची एक मदत देशाच नाव करेल कारण अतुल मध्ये ती धमक आहे.
अतुल शिरोळे पैलवान मोबाइल ०८८६११६९२१७