गणेश मंडळांना सहकार्य करू अशी घोषणा देणाऱ्या हेस्कॉम विभागाने ही केवळ घोषणाच आहे प्रत्यक्षात उतरवण्यात या विभागाला अपयश आले आहे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दर्गा रोड माळी गल्ली बेळगावचे अध्यक्ष मेघन लगरकांडे याना मागील वर्षीच्या बाकी बिलात तब्बल 2826 रुपये वाढीव बिल देऊन या गणेश मंडळास शॉक देण्याचा प्रयत्न केला आहे .बाकी असलेल्या बिला पेक्षा अधिक बिल देऊन ऐन गणेशोत्सवात हेस्कॉम ने मंडळांना भुर्दंड घालत आहे.माळी गल्लीतील मंडळाच जून बिल 1710 रुपये बाकी आहे असं गेल्या डिसेंम्बर महिन्यात दिल होत मात्र आता तेच बिल 4163 रुपये म्हणजे 2826 रुपये वाढीव देण्यात आल आहे.लोकवर्गणीतून साजरा होणारा हा लोकउत्सव सांस्कृतिक ठेवा आहेच धार्मीकते बरोबर लोक मनोरंजन आणि समाजप्रबोधन करणारा हा सण आहे. बेळगावकरांच्या मर्म बांधातील ठेवा म्हणजे गणपती उत्सव, त्या उत्सवालाच जाचक दरवाढीव बंडगा उगारून हेस्कॉमने नेहमी प्रमाणे आपले तिरकस धोरण चालू ठेवले आहे याचा कार्यकत्यानी निषेध नोंदवला आहे.