शहरात सध्या मलेरिया डेंग्यु रुग्ण अधिक असताना लहान कंग्राळी येथील एक किराणा दुकानाचा व्यापारी स्वाईन फ्लु मूळ दगावला आहे.मल्लयया रुद्राय्या हिरेमठ(45) अस रविवारी सकाळी निधन झालेल्या व्यक्तीच नाव असून गेल्या 8 दिवसांपूर्वी त्यांना उपचारा साठी के एल इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांची चाचणी केल्या नंतर h1n1 बाधा झाल्याचं आढळून आलं होतं उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचं निधन झालं आहे. रुद्रय्या यांच्या पश्चात अविवाहित तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.घरातील कर्ता पुरुष गेल्याने हिरेमठ कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.रुद्राय्या हे किराणा दुकान सांभाळत लहान कंग्राळी येथील कलमेश्वर मंदिराचे पुजारी होते.
शहरातील घाणीच साम्राज्य कंग्राळीत..
बेळगाव शहरातील घाणीच पाणी नालयाद्वारे कंग्राळीत शिवारातुन मार्कण्डेय नदीत जात असतंय. वैभव नगर के एल ई कडून एक नाला तर हनुमान नगर सह्याद्री नगर एक नाला अश्या दोन्ही नाल्यातून घाणीच पाणी तुंबल्याने या भागात डासांच प्रमाण वाढलं आहे याचा फटका अनेक रुग्णांना त्रास होत आहे.कंग्राळी भागात गेल्या दोन वर्षात चार जण डेंग्यू मुळे दगावले आहेत.जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी या भागातील स्वच्छता ठेवा यासाठी अनेकदा प्रयत्न केले तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.