Sunday, January 5, 2025

/

गणराज आले … चव्हाट गल्लीत ४० वर्षांची उज्वल परंपरा

 belgaum

 

” श्री गणेशोत्सव ” हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण. हा सण सर्वजण सर्वत्र स्वतंत्ररित्या व सार्वजनिक स्वरूपात साजरा करतात. अशाच प्रकारे सन. १९७८ साली चव्हाट गल्ली येथे सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली. हा सार्वजनिक गणपती उभा करण्यामागे सरपंच श्री महादेवराव बाळाप्पा मोहिते, कॉ. कै. श्री शांताराम नाईक, कै. अमूतराव हसबे, कै.श्री भुजंग येळ्ळूरकर ,कै. म्हात्रू गौडाडकर, कै. श्री . नानासाहेब जाधव, कै. श्री मुकुंद मुचंडी , हवालदार कै. श्री मारुती मुचंडी, अशा अनेक थोर व्यक्तींचा सिहांचा वाटा होता. त्याकाळात बुरुडा करवी मंडप घालून उत्सव साजरा होत असे पण चव्हाट गल्लीमध्ये कुशल कारागीर होते.

कै. श्री लक्ष्मणराव काकतीकर, कै जोतिबा पावशे, कै, श्री वसंतराव किल्लेकर, श्री राणोजी रेडेकर, या सर्व मंडळींनी निश्चय केला की आपण आपला स्वतंत्र मंडप तयार करायला पाहिजे . तेव्हा लाकडी खांब त्यावर लोखंडी पत्रे असा भव्य मंडप तयार करण्यात आला. तितकेच करून ते थांबले नाहीत. कै. मारुती नेसरकर हे सिनेसूष्टीतील ‘ राजकमल ‘ ‘ प्रभात ‘ स्टुडिओमध्ये निष्कराचे काम पहात असत. त्यांच्या सहकार्याने मंडप सुशोभित केला . मंडपामध्ये श्री गणेशाच्या मूर्ती अनुरूप चित्र काढले जात असे. मंडपामध्ये कै. नावगेकर बंधू यांच्या कडून उत्कृष्ट अशी कमान आणि सात ते आठ चित्रे रेखाटली जात असत . असा हा अकरा दिवसाचा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडायचा . रात्रीच्या वेळी भजन, गायनाचे कार्यक्रम आयोजित करीत असत. नाटकसुध्दा सादर करीत असत

Chawat galli

त्याकाळात सकाळच्या व रात्रीच्या आरतीला मंडपात प्रचंड प्रमाणात गर्दी होत असे. १९७८ सालचा ” पाचघोड्याच्यावर स्वार झालेल्या गणपती होता. मूर्तिकार कै. श्री विठ्ठल कुंभार, माडीगुंजी खानापूर होते. मंडळाचे पहिले अध्यक्ष होते कै. श्री जोतिबा पावशे .
१९७८ सालापासून ते आतापर्यंत सकाळी व सायंकाळी सनई वाजली जाते. असा हा चव्हाट गल्लीचा ‘ श्री गणेशोत्सव” असून अनेक विधायक उपक्रम जपत मंडळाची वाटचाल सुरू आहे.
मागील सात वर्षे मंडळाचे अध्यक्ष श्री यशोधन किल्लेकर आणि उपाध्यक्ष विश्वनाथ मुचंडी हे आहेत. गल्लीतील सर्वच नागरिक या मंडळाच्या
कार्यात सहभागी होतात, विसर्जन मिरवणुकीत याचे चित्र दिसते, बाप्पाच्या भक्तीसाठी सारेच एकत्र येऊन गणेशोत्सवात रंग भरतात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.