एक वर्षी वेगवेगळी फुल,एक वर्षी द्राय फ्रुट्स, एक वर्षी शेडू तर एक वर्ष वेगवेगळी कडधान्यतुन आणि या वर्षी कागदी कप अश्या केवळ पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवणार नानावाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळ शहरातील पर्यावरण पूरक गणेश मंडळ म्हणून समोर येत आहे.
नानावाडी भागात निवृत्त लष्करी जवान फार आहेत यामुळे शिस्त असते .मंडळात एक्स आर्मी चे लोक आहेत. मंडळाने गेली 10 वर्ष फटाके वाजवणे बंद केलं आहे.डॉल्बी तर सुरुवाती पासून नाहीच आणि मूर्ती बनवण्यास मंडळाचे कार्यकर्ते देखील मदत करतात, सध्या रवी सावंत हे अध्यक्ष आहेत.
नानावाडी मंडळाची २४ वर्षापूर्वी स्थापना झाली आहे. या मंडळातर्फे बरेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्वच्छ भारत अभियान दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी राबविला जातो. तसेच वैद्यकीय तपासणी शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, डेंग्यू/ मलेरिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर हे उपक्रम सातत्याने राबवले जातात.
यंदा कागदी कपा पासून तयार केलेली मूर्ती साकारण्यात आली आहे . यासाठी साधारण ९,५३१ कागदी कप लागले आहेत. मउरतीच्या तळात गवत आणी कागदाचा वापर केलेला आहे. मूर्ती बनवताना रंगाचा अथवा पर्यावरण हानिकारक असा कुठल्याही पदार्थाचा वापर केलेला नाही. ही मुर्ती पूर्णपणे प्रदूषण विरहित असून पर्यावरणा मध्ये सहजगत्या विलीन व्हावी ह्या उद्देश्याने तयार केलेली आहे. ही मुर्ती श्री सुनील आनंदाचे, मनिष पाटील व सहकाऱ्यांच्या १५ दिवसांच्या अथक परिश्रमातून साकारलेली आहे. ही मुर्ती साकारण्यास मंडळाचे सदस्य सर्व श्री श्रीकांत आजगांवकर, रवी सावंत, सुदेश मांगुरे, उदय सावंत आदींचे मार्गदर्शन लाभले.
2012 साली मंडळाने वाळूने बनवलेली मूर्ती साकारली होती,2013 मध्ये नॉर्मल शेडू ची मूर्ती,
2014 मध्ये फुलांचा गणपती साकारण्यात आला. विविध नमुन्यांची फुले त्यासाठी वापरण्यात आली होती.2015 साली ड्राय फ्रुटस चा गणेश होता तर
2016 मध्ये विविध नमुन्यांची धान्ये वापरून आणि यावर्षी कागदी कप वापरून गणेशमूर्ती बनवण्यात आली आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवी सावन्त यांनी बेळगाव live कडे दिली आहे.
यावर्षी कपांची मूर्ती इतकी सुबक बनविली आहे की कुणी प्रदर्शनात ठेवायला मागितली तर देण्याची तयारी मंडळाने केली आहे.