भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्या वरून मंत्री डी के शिवकुमार यांच्यावर आयकर धाड पडली आहे असा आरोप पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
माहिती खात्याचा डिजिटल फलक चनम्मा चौकात उदघाटन केल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.डी के शिव कुमार यांच्यावर आय टी रेड हा भाजपचा छुपा अजेंडा आहे कोणत्याही चौकशीस सामोरे जायला डी के शी तयार आहेत हवं तर ते जेल ला देखील जातील अस देखील जारकीहोळी म्हणाले
भाजपच्या राजकीय प्रेरणेने या आयकर खात्याच्या धाडी घातल्या असून काँग्रेस पक्ष याला उत्तर देण्यास समर्थ आहे अश्या धाडीकडे आम्ही लक्ष देत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं