सेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीने नाला वळवून अपार्टमेंट्स बांधलेलं प्रकरण चर्चेत असताना याच सर्व्हे नंम्बर मधील अन्य एकास बांधकाम करण्यास बुडा आणि पालिकेने परवानगी देण्यास टाळाटाळ चालवली आहे
जाधव नगर मधील नाल्याच्याच सर्व्हे नंम्बर मध्ये सामान्य माणसाला बांधकाम परवानगी देण्यासाठी पालिकेने बुडाला पत्र लिहिलं आहे की त्या ठिकाणी नाला आहे की नाही याची माहिती द्या मग बुडा पालिकेस पत्र लिहून कळवते की तुमच्या शहर प्लनिंग विभागात तुम्हीच याची चौकशी करा अस असताना बांधकाम परवानगी साठी गेली दीड ते दोन वर्षे टोलवा टोलवी सुरूच आहे.
एकीकडे एकाच सर्व्हे नंम्बर मध्ये सेव्हन कन्स्ट्रक्शन ला बांधकाम परवाना दिला जातो बुडा किंवा अन्यत्र कोणतेही पत्र व्यवहार झाले नाहीत वेळकाढू पणा झाला नाही तर दुसरीकडे सामान्य माणसाला नाला आहे म्हणून अद्याप परवानगी मिळाली नाही दीड वर्ष फाईल पेंडिंग आहे याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरत आहे. की राजकीय वजन वापरून सेव्हन कन्स्ट्रक्शन ला अधिकाऱ्यांनी परवानगी दिली? पदाचा गैर वापर झालाय का ?असा प्रश्न इथे उपस्थित होताना दिसत आहे.