बेळगावातील अपंग स्वीमर सिमरन विवेक गौडवाडकर(15 वर्ष) हिने जागतिक बुटक्यांच्या स्पर्धेत(world dwarf games) एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकाची केली आहे. कॅनडा येथील ऑंटेरियो येथे 4 ते 12 आगष्ट पर्यंत या स्पर्धेचं आयोजन केलं होत.
सिमरन ने 25 मीटर,50 मीटर फ्री स्टाईल,50 मीटर बॅक स्ट्रोक आणि 50 मीटर बटरफ्लाय मध्ये भाग घेतला होता.
2009 पासून ती स्विमिंग करत आहे राष्ट्रीय स्पर्धात 8 सुवर्ण आणि 1 सुवर्ण पदकांची राष्ट्रीय स्पर्धातून पदकांची कमाई केली आहे.नुकताच झालेल्या स्विमिंग स्पर्धेत महिला विभागात उत्कृष्ट धावपटू किताब देण्यात आला होता.
सिमरन ही स्विमर्स क्लब आणि अकवेरीयस स्विमिंग क्लब सदस्य असून डी पी शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे.जे एन एम सी आणि कार्पोरेशन गोवा वेस स्विमिंग पुल स्विमिंग चा सराव करत असते. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी,प्रसाद तेंडोलकर, सुधीर कुसाने,गोवर्धन काकतकर,आणि महिला प्रशिक्षक सई जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.