बेळगावातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात येणार आहे.मार्केट पोलीस ए सी पी शंकर मारिहाळ आणि सेंट पॉल शाळेत शिकलेले बंगळुरू लोकायुक्त पोलीस अधिकारी बसवराज मगदूम यांची निवड राष्ट्रपती पदकासाठी करण्यात येणार आहे. या दोघांना पुरस्कार मिळणार असल्याने बेळगाव साठी अभिमानाची गोष्ट आहे.
आगामी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत पुरस्कार दिला जाणार आहे.बेळगावातील जिल्हा क्रीडांगणात पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट,उपायुक्त सीमा लाटकर,अमरनाथ रेड्डी यांनी ए सी पी मारिहाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार निवड झाल्याने गुच्छ देऊन सत्कार केला