जिल्हाधिकाऱ्यांना पहिले निवेदन चारोलियाचे….
ऑटोनगर येथील रुरल आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला परीक्षेस बसायला देण्यास कॉलेज प्रशासनाने टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे पैशाच्या लोभापायी कॉलेज प्रशासनाची संवेदनशीलता हरवली आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय.सोमवारी पदावर रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्वात पहिले निवेदन दिले ते अन्यायग्रस्थ विद्यार्थिनी चारोलीया हिने, तिची व्यथा ऐकून हे अधिकारीही सुन्न झाले.
यावेळी जमीर हनचिन्मनी आणि अन्य समाज सेवक उपस्थित होते.गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव live ने मोजमा चा संघर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडला होता.
बेळगाव live च्या न्यूज ची दखल घेत आयुष मेडिकल बोर्डाच्या अधिकाऱ्यानी मोजमम ला फोन करून बुधवारी सरकारी कार्यलयात भेटा न्याय देऊ अशी सूचना केली होती. बेळगावातील अनेक लोक प्रतिनिधीनी देखील मदत करण्याची तयारी दर्शवली होती त्यातच नूतन जिल्हाधिकार्यानी देखील मदतीचा आश्वासन दिल्याने शिक्षनासाठी लढणाऱ्या या युवतीस न्याय मिळणार आहे.