शहरात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या सफाई ठेकेदारांना जाब विचारून आवश्यक कारवाई केली जाईल अस आश्वासन महापौर संज्योत बांदेकर यांनी दिल आहे.
गणेशपूर , ज्योतीनगर येथील अनेक सफाई कामगारांना कमी करून नव्याने कामगार भरती करण्यात आली आहे सफाई कंत्राटदाराने कामगारांना अचानक पणे कामा वरून काढून टाकण्यात आल्याने सर्व कामगार बरोजगार झाले आहेत त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे , या बाबत चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी मराठी भाषिक युवा आघाडी अनेक संस्थाच्या पुढाकाराने पालिकेत विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत सफाई कामगारांनी कंत्राटदारा कडून कश्या पद्धतीने त्रास दिला जातो याची माहिती दिली.यावर पालिका अधिकारी उदयकुमार यांनी सर्व तक्रारी नोंदवून घेतल्या.सफाई कंत्राटदार जाब विचारून कामगारांच्या समस्या सोडविण्याचं आश्वासन महापौर बांदेकर यांनी दिल.यावेळी उपमहापौर नागेश मंडोळकर, स्थायी समिती अध्यक्ष राजू बिरजे,गटनेते पंढरी परब, सरिता पाटील आदी उपस्थित होते. कामगारांच्या वतीनं शिवाजी सुंठकर भाऊ गडकरी किरण गावडे आदींनी समस्या मांडल्या.