केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजने अंतर्गत बेळगाव कॅटोंमेंट बोर्डाने यश मिळवलं आहे. स्वच्छ भारत हागनदारी मुक्त योजनेत देशातील 62 कॅन्टोन्मेंट मध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंटने 11वा तर पुणे दक्षिण कमांड मध्ये दुसरा क्रमांक मिळवला असल्याची माहिती कॅटोंमेंट बोर्डाच्या नवीन सी ई ओ दिव्या शिवराम यांनी दिली आहे.
कॅम्प येथील कॅटोंमेंट बोर्ड कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मराठा सेंटरचे ब्रेगेडियर कॅटोंमेंट बोर्ड अध्यक्ष गोविंद कलवाड यांनी सी ई ओ दिव्या शिवराम यांना हागनदारी मुक्त प्रमाणपत्र प्रदान केले.बेळगाव कॅटोंमेंट परिसराची 20 हजार लोकसंख्या असून सध्या पूर्ण छावणी सीमा परिषदेच्या सर्व प्रभागाचा स्थानिक नगरसेवकां सोबत दौरा करत असून स्वच्छते वर अधिक भर देणार आहोत. या दौऱ्यात रस्ते आणि पथदीप समस्यां कडे ध्यान देणार आहोत असं देखील दिव्या यांनी यावेळी स्पष्ट केलं.
स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेल्या यशाचे मानकरी कॅटोंमेंटचे अधिकारी आणि सदस्यच नसुन पडद्या मागुन मदत केलेल्या सिव्हीलीयन नागरिक देखील आहेत.बेळगावच्या या छावणी सीमा परिषदेच्या एक भाग असल्याचा अभिमान आहे अस मत ब्रेगेडिअर गोविंद कलवाड यांनी दिली.
कॅटोंमेंट बोर्ड सर्वांना सोबत घेऊन विकास करू अस देखील ते म्हणाले.