देशातील पहिले नाणे ,विविध राजांच्या राजवटीतील नाणी ,नोटा अस सगळं काही दुर्मिळ अरुण कामुले यांनी गुजरात भवन येथे आयोजित नाणी प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत . गेल्या पन्नास वर्षापासून अरुण कामुले हे नाणी आणि नोटा यांचा संग्रह करत आहेत . प्रदर्शनाला विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली आहे .
इसवी सन पूर्व ६ व्या शतका पासून २१ व्या शतक पर्यंतच्या हजारो नाणी आणि चलनी नोटांच अनोख प्रदर्शन बेळगावातील गुजरात भवनात भरवण्यात आल आहे येणाऱ्या पुढच्या पिढीला इतिहास कालीन नाण्याचा छंद कळावा या आगळ्या वेगळ्या उद्देशाने अरुण कामुले या बेळगावातील नाणी प्रेमी च्या संग्रह केलेल्या नाण्यांच्या प्रदर्शनाला बघायला गर्दी होत आहे.अखंड भारतच पहिले नाण गांधहार, जनपद, मगद, उज्जैन ,चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, चोला या सह हजारो नाणी या प्रदर्शन मध्ये मांडण्यात आली होती गेली २२ वर्ष या हजारो नाण्याच प्रदर्शन बेळगावात भरवलं जातंय त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे अनेक विध्यार्थी या प्रदर्शलन भेट देत आहेत इतिहास कालीन नाणी जपत गेली ५० वर्ष अरुण कामुले याने एक वेगळाच छंद जोपासला आहे तो पुढच्या पिढी साठी निश्चितच ज्ञान दायक आहे . उद्या त्यांच्या प्रदर्शनात अडीच रुपयाची नोट जी १९१६ ते १९२२ या कालावधीत ही नोट चलनात होती ती प्रदर्शनात ठेवली जाणार आहे .