सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पहाण्यासाठी गर्दी होतच आहे मात्र वडगांव रयत गल्ली आणि भारतनगर येथील घरघुती गणेश मूर्ती देखावे पहाण्यासाठी गर्दी वाढत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रयत गल्ली वडगाव मध्ये घरगुती गणपती समोरील आरास पाहण्यास मोठी गर्दी होत आकरा दिवसात यात्रेचे स्वरुप पहावयास मिळत आहे.अनेक भक्त वेगवेगळ्या प्रकारचे हालते तसेच इतर प्रकारचे देखावे सादर करत शासन तसेच जनतेला संदेश, ऎतिहासिक तसेच परिसरात होणाऱ्या यात्रा व इतर अनेक प्रकारचे आकर्षक देखावे या भागात गल्लीत सादर केले आहेत.
महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,कोकण चक्क हैदराबाद तसेच परिसरातील अनेक भक्त नंबर लावून शिस्तीने दर्शन घेत समाधान व्यक्त करत पुर्ण बेळगावमधील मंडपातील गणपती पहाण्यापेक्षा रयत गल्लीतील घरगुती गणपती आरास पाहिल कि सर्व गणपती पाहिल्याच समाधान होत आहे अश्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या मंगळवारी तर खुद्द बेळगावचे उपजिल्हाधिकारी डॉ सुरेश इटनाळ साहेब सहकुटूंब येऊन सर्व आरास पाहून हुरळून जात त्यांना मोबाइलमधे फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.जनतेचा ओढा येवढा असतो कि मध्यरात्री दोन ते पहाटे सहा पर्यंत गर्दी संपत नाही.
हिंदू संस्कृती सण, पुतना वध,सुरक्षा करुया पीकाउ धरणी मातेचे.आणी संपवू प्रदुषण वाचवू पाणी, वृक्षतोड तसेच वाचवू सुपीक जमीन सिमेंटीकरण,भक्त प्रल्हादच्या हाकेला धाऊन आलेले नरसिंह,लक्ष्मी यात्रा रथोत्सव,मंगाई यात्रा प्रतिकृती,लोकमान्य टिळकांनी साजरा केलेला गणेशोत्सव,मराठा मोर्चा इतर वेगवेगळे देखावे लक्षवेधी झाल्याने रयत गल्ली घरगुती गणपती आरासच मोठ दालनच अस प्रचलीत झालय.