बेळगाव हुन मुंबई बंगळुरूसाठी आगामी दसरा आणि दिवाळी साठी हॉलिडे स्पेशल गाड्या देऊ अस ठोस आश्वासन हुबळी दक्षिण पाश्चिम रेल्वेचे मुख्य कार्यनिर्वाहक वाणिज्य प्रबंधक के शिव प्रसाद यांनी दिल आहे.बुधवारी एक दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आले असता सिटीजन कौन्सिलच्या वतीनं सतीश तेंडुलकर यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उपरोक्त आश्वासन दिलं आहे.दसरा दिवाळीच्या तारखा देखील निवेदनात देण्यात आल्या आहेत.
दसरा दिवाळीच्या गाड्या आताच फुल्ल झाल्या असून अनेकांना खासगी बस मध्ये अवाढव्य पैसे मोजावे लागत आहेत त्यामुळे मुंबई आणि बंगळुरू हॉलिडे स्पेशल गाडी ध्या अशी मागणी करण्यात आली.
रेल्वे संरक्षण भिंतीचा सर्वे करू
रेल्वे स्थानक ते चौथ्या गेट पर्यंत गेल्या सहा महिन्यात 19 जणांनी आत्महत्त्या केल्या आहेत त्यामुळं शहराच्या मधोमध जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक ला नियमानुसार संरक्षण भिंत बांधा यावर चर्चा करताच खातेनिहाय सर्व्हे करू अस आश्वासन प्रसाद यांनी दिल अपघात आणि आत्महत्या वर नियंत्रणा साठी पहिल्या ते चौथ्या गेट पर्यंत प्रत्येक गेट वर एक पोलिस बंदोबस्तात साठी तैनात करा अशीही मागणी केली.
कॅटोंमेंट मिलिटरी जवानांची सोयीसाठी हुबळी ते जम्मू कटरा ही डायरेक्ट व्हाया पुणे रतलाम आग्रा दिल्ली पानिपत अंबाला भाटिण्ड कटरा ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत या शिवाय रेल्वे रेव्हेन्यू साठी बेळगावात तिकीट तपासणीस केंद्र सी सी एम स्कॉड तैनात करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.यावेळी सिटीजन फोरम चे सेवंतीलाल शाह देखील उपस्थित होते.